नायगाव : मधुकर जवळे
शिक्षणासाठी दररोज खेड्यापाड्यातून विद्यार्थी दररोज येतात पण नायगावच्या बस स्टैंडवर विद्यार्थ्यांना तासंतास थांबून राहावे लागते अशा वाहकाची वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्याची कान उघडी करावी असे ही विद्यार्थासह जनतेतून बोलल्या जात आहे
नायगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी बाहेर गावातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी मोठया संख्येने येत असतात शासकीय पास काढून सुद्धा राज्य परिवहन मंडळाच्याचालकासह वाहक विध्यार्थीना बस मध्ये नेण्यासाठी नकार देत असल्यामुळे सदरच्या वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यानी बस चालकासह वाहकाला विध्यार्थीना नेण्यासाठी सूचना कराव्यात अशी मागणी जोर धरित आहे
दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोज मंगळवारी ठीक चार वाजता अमरावती ते नांदेड धर्माबादला जाणारी बस
नायगाव अमरावती बस ही बस स्टैंड वर येऊन थांबून विद्यार्थ्यांना सरळ सरळ बस मध्ये घेण्यास नकार दिला वरिष्ठांनी लक्ष घालून अशा वाहकावर कारवाई करण्यात यावी असे विद्यार्थी वर्गातून बोलल्या जात आहे बसचे पास काढून विद्यार्थ्यांचा काय फायदा विद्यार्थ्यांना तसेच मध्ये जाता येत नसल्यामुळे विद्यार्थी प्रायव्हेट कोणत्याही वाहनातून प्रवास केल्या जात आहे

0 Comments