नायगाव विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे -
नायगाव तालुक्यातील मांजरम व कोलंबी व नांदेड शहर येथे चित्रित झालेला "राडा" हा चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्र भर प्रदर्शित होत असून निर्माता राम शेट्टी व दिगदर्शक रितेश नरवाडे या नवोदित पण धाडसी निर्णयाने चित्रपट क्षेत्रात उंच मारलेली गगन भरारी म्हणजे मांजरमच्या वाड्यात झालेला हाणामारी व खुनाचा " राडा"म्हणजे अखे टेन्शन गाडा एक वेळ अवश्य पहा राडा असा दाक्षिणात्य चित्रपटाच्या हानामरीचा स्पर्षं असलेला चित्रपट राडा होय.
चित्रपटाच्या प्रारंभी चा व मध्यवर्ती स्थान असलेला सिन मांजरम येथील शिवराज विश्वाभंरराव पोलीस पाटील यांच्या पुरातन वाड्यात झालेला आहे. तर काही सिन कोलंबी येथील संजय बियाणी यांच्या फार्म हाऊस व त्या समोरील डोंगराच्या माथ्यावर चित्रित झाला आहे
मांजरम कोलंबी येथील नागरिकांसह नायगाव तालुक्यातील अनेकांचा सहभाग असलेला राडा हा चित्रपट दिनांक २३ सप्टेंबर २०२२ शुक्रवार रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपट पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांना खूप उत्सुकता लागली आहे.
आपली माती आणि आपली माणस या प्रमाणे नांदेड चे रहिवाशी असलेले दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीन ही धुरा सांभाळल्या आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना व एका गाण्याची धुरा मयुरेश केळकर यांनी सांभाळली असून गाण्याचे बोल जाफर सागर शब्दबद्ध केले आहेत व त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. तर हा सिनेमा के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
या ॲक्शनपटात आता आणखी कोणते कलाकार दिसणार हे पाहणं औत्स्युक्याचे ठरेल आणि २३ सप्टेंबर २०२२ रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत असून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या "राडा" या मराठी चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे , या चित्रपटात नांदेड जिल्ह्यातील व नायगाव तालुक्यातील अनेक हरहुन्नरी कलाकारांने भूमिका साकारली आहे.
तालुक्यात असलेल्या बरबडा येथील जिल्हा परिषद शाळे वरील शिक्षक शिवाजी महादजी शेवाळे यांचा ही या चित्रपटामध्ये छोटा अभिनय आहे.
नांदेड येथील नवोदित अभिनेता आकाश शेट्टी (तुप्तेवार) या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करत आहेत आकाश शेट्टी सह, योगिता चव्हाण हे नवोदित चेहरे या चित्रपटात दिसणार असून त्यांच्या सोबतच मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिलिंद गुणाजी,निशिगंधा वाड, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, राम चव्हाण,निकिता पंडित,नांदेडचे क्लावन्त रवी जाधव सतीश कासेवार लच्छू देशमुख, संभाजी हामंद बाल कलाकार मार्तंड रमेश पांडे अशी तगडी सिने मंडळी या सिनेमात झळकणार आहे.
त्यामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता आणखीनच वाढली आहे.राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशनचा हा चित्रपट आहे.संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवार २३ सप्टेंबर पासून आपल्या कला कृतीचा "राडा" घालणार असून प्रेक्षकानी हा नांदेडचा "" राडा "" दिल्लीसह पुरस्कारासाठी धाडा ही अपेक्षा निर्माता राम शेट्टी व रमेश पारसेवार, व सर्व कलावंतांनी प्रमोशन शो च्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

0 Comments