Header Ads Widget

ब्रेकिंग न्यूज - पुर्णा रेल्वे स्टेशन परिसरातील एका तरुणीचा खुन करून पलायन करणाऱ्या त्या प्रकरणातील आरोपीला आंध्र प्रदेशातून जेरबंद : परभणी पोलीसांची कामगिरी !!

सय्यद कलीम पूर्णा - 

पूर्णा शहरातील तडीपार परिसरामध्ये एका २२ वर्षीय तरुणीचा युवकांनी निर्घृण पद्धतीने खून करून पलायलन करणाऱ्या त्या प्रकरणातील आरोपीला परभणीचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यासह रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी यांच्या संयुक्त मोहीमेत आरोपीला हैद्राबाद येथून अटक करण्यात आली असून या मध्ये परभणी पोलिसांचे मोठे योगदान असून सदरील तरुणीचा खून करून तो आरोपी घटना स्थळा वरून फरार झाला होता या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी पूर्ण शहरांमध्ये दोन दिवसा पासून तळ ठोकून बसले होते अखेर या घटनेची संपूर्ण माहिती महाराष्ट्र पोलीसानी आंध्रप्रदेशच्या पोलीसाना देण्यात आली होती
पुर्णा रेल्वे स्टेशन परिसरातील तडीपार मैदानात शरीरावर दगडाचे वार करून एका तरुणीचा खून प्रकरणातील आरोपीस हैद्राबाद येथे अटक करण्यात आले असून परभणीचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या आदेशानुसार ताब्यात घेण्यात आलेले आरोपीचे नाव अरबाज खान पठाण वय वर्ष राहणार हैद्राबाद येथील रहिवासी असून सदरची मयत तरुणी ही त्याची पत्नी  असल्याचे सांगण्यात येते त्यांच्या कौटूंबीक वादातून आरबाज खान यांनी दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी पत्नीस पुर्णा रेल्वे स्टेशन येथे आणले होते तिचा दगडाने ठेचून पत्नीचा खुन करून सरचा आरोपी फरार झाला होता

एक महिन्या पुर्वीच याचा विवाह झाला होता असे सांगण्यात येते विवाहाच्या नंतर झालेल्या वादातून त्याने पत्नीचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आदीक माहिती मिळण्याची शक्यता आहे

सदर प्रकरणातील आरोपीच्या विरोधात पुर्णा पोलीस ठाण्यात गु.र.नं.२२२/ २०२२ कलम ३०२ भा.दं.वि.गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात रेल्वे स्टेशनसह पुर्णा शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज परभणीचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यासह परभणी पोलिसांनी तपासले होते सदरच्या तपासा दरम्यान आरोपी हा हैद्राबाद येथील असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती परभणी पोलीसांनी  दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी हैद्राबाद येथे केलेल्या कारवाईत सदरच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे









Post a Comment

0 Comments