Header Ads Widget

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरबडावाडीचे अशोक जेठेवाड गुरुजी यांचे निधन

नायगाव फास्ट न्यूज :-

वेंकटेश नगर नायगाव येथील रहिवाशी तथा मुळ बरबडा  येथील रहिवासी व सद्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरबडावाडी ता. नायगाव येथे कार्यरत असलेले सहशिक्षक अशोक तुकाराम जेठेवाड यांचे नांदेड येथे उपचारा दरम्यान  निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय ४८ वर्ष होते.विद्यार्थीप्रिय आणि उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची ख्याती होती. नायगाव पंचायत समितीने त्यांना गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.
दिनांक  २३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्यावर गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येनार आहेत.त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी यश नगरी युनिट दोनच्या बाजूला असलेले यशश्री नगर ते मोरचौक मार्गे गोवर्धनघाट असी निघणार आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी,मुले असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments