नायगाव विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे -
कहाळा गडगा रस्ता चांगला झाला असलातरी मांजरम गावाजवळ काम राहिलेल्या कामावर एवढे खडे पडले आहेत की वाहन चालवणे तर सोडा पायी चालणे देखील अवघड बनले असून तात्काळ येथे मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचे काम करावे अशी मागणी माजी प.स.शिवाजी गायकवाड यांनी उपविभागीय आभियंता सा.बा.विभाग नांदेड यांच्या कडे केली आहे
नायगाव तालुक्यातून गेलेला हा रस्ता मांजरम गावाच्या जवळ दोन्ही बाजूने नाली बांधकाम अर्धवट होऊन वादा मुळे काम बंद करण्यात आले आहे.सदर कामावर एक ही खडा के.टी.कन्स्ट्रक्शन ने न टाकल्याने व अतिवृष्टीच्या पाण्यानी खड्डे च खड्डे झाली आहेत.वाहन धारक खड्डे चुकवण्यासाठी नागमोडी आकारात वाहने चालवत असल्याने बरीच आपघात यथे होत आहेत.
अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून राहू लागल्याने अपघाताला आमंत्रण दिले जात आहे. खड्याने पाणी भरल्याने पादचाऱ्याचा आंगावर वाहनाचे पाणी उडत आहे या रस्त्याच्या दुतर्फा वस्ती असल्याने ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावे लागत आहे या विषयी शिवाजी गायकवाड यांनी उपविभागीय अभियंता मुदखेड यांची,खा. चिखलीकर व के.टी.कन्स्ट्रक्शन चे शिंदे यांची भेट घेऊन नागरीकाची होणारी अडचण वाहन धारकांची तारेवरची कसरत थांबवण्या साठी प्रयत्न करावेत नाहीतर येत्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी या विषयावर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

0 Comments