Header Ads Widget

हिमायतनगर शहारासह तालुक्यात दुर्गा देवीची स्थापना विशेषता महिलांची उपस्थिती आणि उत्सुकता !!


हिमायतनगर  : नागोराव शिंदे - 

हिमायतनगर शहरासह तालुक्यात सर्वत्र दुर्गा महोत्सवाच्या कार्यक्रमाने रोषणाई फुलून आली असून या सदरच्या कार्यक्रमाच्या घटस्थापनेच्या निमित्ताने महिला पुरुषांसह बालक वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून दुर्गा महोत्सवाच्या कार्यक्रमात सहभाग घेत असल्यामुळे तालुक्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले असून या नवरात्रीच्या कार्यकाळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून यात भजन कीर्तन गोंधळी गवळणी व सांप्रदायिक कार्यक्रमाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमच्या नायगाव फास्ट न्यूज च्या हिमायतनगर च्या विशेष प्रतिनिधी ने सांगितले आहे 
 हिमायतनगर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत व तालुक्यात दुर्गा मातेच्या स्थापनेची माहिती नायगाव फास्ट न्यूज घेत असून सध्याच्या परिस्थितीत कोणत्या गावात किती दुर्गादेवी बसविण्यात आल्या आहेत याची परिपूर्ण माहिती मिळावी नसली असली तरी दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी रोजी पासून घटस्थापना करण्यात आली असल्याने येत्या नऊ दिवसाच्या कार्यकाळात दुर्गादेवी महोत्सवाच्या निमित्ताने अतिशय सुंदर अशी रोषणाई पसरली असल्याचे वृत्त आहे 
तालुक्यात दुर्गादेवी महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त अनेक ठिकाणी जागरण गोंधळ असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याने दुर्गा महोत्सवाचा सणा अतिशय शांततेत पार पाडण्यासाठी गावकर यासह प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने परिपूर्ण काळजी घेतली असून यापूर्वीच शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील यांनी सर्व जनतेला आव्हान केले होते की दुर्गा महोत्सवाच्या काळात अतिशय शांततेचे वातावरण ठेवून सदर चे कार्यक्रम साजरे करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे अन्यथा पोलिस प्रशासनाच्या वतीने खडक कारवाई करण्यात येणार असल्याचे ही व डिजेवर बंदी असल्याचे ही उपविभागीय अधिकारी पाटील यांनी सांगितले होते 




Post a Comment

0 Comments