बिलोली प्रतिनिधी शंकर पवारे -
बिलोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित १९९५ चे माजी विद्यार्थीयाकड़ून सेवानिवृत्त माजी शिक्षकांचा सत्कार व गौरव करण्यात आला असून गुरु -शिष्य परंपरा भारतीय संस्कृती मधील महत्वपूर्ण आणि पवित्र व विशेष भाग जीवनात आई-वडिलांचा जागा कोणीही भरु शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणन्याचे श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आई -वडील असतात असतात हे पोती पुराण अनेक वर्षा पासून सांगत आहे
देशात प्राचीन व पुरातन काळा पासून गुरु -शिष्य परंपरा असल्यामुळे शिक्षक हे आम्हाला जगण्याचे योग्य मार्ग दाखवतात योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरीत करतात सर्व पल्ली डॉ.राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला जिल्हा परिषदेचे सेवानिवृत शिक्षक श्यामसुंदर इनामदार,अमृत गवलवाड,आलगे यांच्या हस्ते प्रतिमेला गुरुजनाचे हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेत ६० वर्ष सेवा देणाऱ्या श्यामसुंदर इनामदार, अमृत गवलवाड, आलगे यांच्या सत्कार व गौरव करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी शाळेचे जेष्ठ सेवानिवृत शिक्षक श्यामसुंदर गुंडेराव इनामदार,अमृत बाबाराव गवलवाड,आलगे ,मजहर कुरैशी शिपाई संजय गंजगुंडे जिल्हा परिषद हाईस्कूल आदिची उपस्थित होती
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे १९९५ च्या माजी विद्यार्थी शेख फारुख अहमद, दिलीप उत्तरवाड, अमित बिलोलीकर, माधव एडके,बासित खान,गणेश पवार,शकील सिदिखीं,उल्लास चौधरी
तजमुल बेग मनोहर देशमुख शेख मुशीर,जाफ़र बेग,शंकर जिकलवाड,शेख अफजल आदिनी परिश्रम घेतले असल्यामुळे त्यांचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे

0 Comments