Header Ads Widget

इकळी माळच्या सुलोचना पुयड यांना 'माझी मी भारी - नारी सन्मान २०२६' पुरस्कार जाहीर

      मारोती इबितवार
ग्रामीण भागातील महिला आरोग्य, स्त्रीभ्रूणहत्या विरोधी जनजागृती आणि महिला स्वावलंबन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल इकळीमाळ (ता. नायगाव, जि. नांदेड) येथील आशा वर्कर तथा समाजसेविका सुलोचना गोविंदराव पुयड यांना 'माझी मी भारी - नारी सन्मान २०२६' पुरस्कार जाहीर झाला आहे.

Innovative Makers Academy Foundation, नाशिक या संस्थेच्या वतीने दरवर्षी समाजात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार दिला जातो. जिद्द, संघर्ष, प्रेरणा आणि गौरव या चार आधारस्तंभांवर या पुरस्काराची निवड केली जाते.

 सुलोचना पुयड यांनी मागील अनेक वर्षांपासून माता-बाल संगोपन, गरोदर मातांचे समुपदेशन, स्त्रीवादी लेखन आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संस्थेच्या आयोजक प्रा. आशा बिरारी पाटील यांनी त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

या सन्मानामुळे इकली माळ परिसरासह संपूर्ण नायगाव तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा लवकरच नाशिक येथे संपन्न होणार आहे.

Post a Comment

0 Comments