Header Ads Widget

रुईच्या पाझर तलावाची पाण्याची पातळी खालावल्यामुळे पांढऱ्या बगळ्या सह काळे रंगीबेरंगी बगळ्याची तळ्यावर गर्दी !!

            माधव पवार 
राज्यात दुष्काळाचे संकट शेतकऱ्यावर कोसळले त्या पाठोपाठ आता पशु पक्षावर ही येत्या काही महिन्यात पाण्याचा प्रश्न व पशु पक्षाचा खाण्याचा प्रश्न चांगलाच उद्धभवणार असल्याची चाहूल लागली आहे 
रुई बु येथील पाझर तलावावर पाण्याची पातळी खालावली असल्यामुळे सदरच्या तळ्यावर पांढऱ्या शुभ्र व काळ्या रंगाचे आणि रंगीबेरंगी पक्षाची गर्दी होताना दिसून येत आहे 

नांदेड जिल्ह्याच्या नायागांव तालुक्यातील रुई बु येथील पाझर तलावात यंदा पावसाचे प्रमाण झिरो असल्यामुळे तळ्यात एक ते दोन महिने पुरेल इतकाच पाणी साठा आहे

या वर्षी या पाझर तलावात मासोळ्या सोडण्यात आल्या नसल्यामुळे सदरचे पांढरे व काळ्या रंगाचे आणि रंगींबेरंगी रंगाचे पक्षी आपल्या पोटाचा उदाहरण निर्वाह करण्यासाठी सदरच्या तळ्यावर गर्दी करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

राज्यात जसे शेतकऱ्यावर दुष्काळाचे संकट कोसळले तशाच पद्धतीने पशु पक्षावर ही संकट कोसळल्याची चाहूल पक्षांना लागली आहे 

जवळ पास असलेल्या तलावर जाऊन सदरचे पक्षी मासोळ्या व किडे मुंग्या बेंडक खात होती परंतु सध्याच्या परिस्थितीत पाण्याची पातळी केवळ पाच अथवा सहा फूटच राहिली असल्यामुळे प्राण्यावर ही उपास मारीची वेळ आली आहे


Post a Comment

0 Comments