Header Ads Widget

राज्यात विकासा विना मच मच व पच पच लई वाढली हे कसले राज्य कर्ते शेतकऱ्याच्या बोकांडीवर !!

            माधव पवार 
राज्यातील तीन पक्षाचे सरकार अस्तित्वात आल्या पासून या राज्यातील राजकीय नेते विकासाचे नाव बाजूला ठेवून पक्ष फोडीचा प्रकार चालून सत्तेत आले परंतु या सरकारच्या कार्यकाळात मच मच व पाच पाच फारच वाढली असल्यामुळे सदरच्या सरकारवर शेतकरी व जनता नाराजी व्यक्त करीत आहे 

हे राज्यातले सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिठवीत नाही अथवा कोणत्या ही परवानगीत मागण्या पूर्ण करीत नाही ना कोणता विकास करत नाही ना कोणत्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही परंतु या सरकारच्या कार्यकाळ प्रचंड महागाई वाढल्यामुळे जनसामान्य माणूस त्रस्त आहे 
 
हे राज्यातले दळभद्री सरकार सत्तेत आले तेव्हा पासून या राज्यातली आर्थिक परिस्थिती ढसाळल्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला चांगलीच कातर बसत असली तरी यावर्षी शेतकऱ्यावर फार मोठे संकट कोसळले दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा या दळभद्री सरकारचे लक्ष शेतकऱ्याकडे नसल्यामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे 

या सरकार पुढे अनेक आव्हाने समोर असताना या सरकारला एक ही आव्हान पेलण्याची ताकद या सरकार मध्ये नाही तर मग या राज्यातील तीन पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या बोकांडीवर बसले व नुसते नावालाच उरले की काय असा प्रश्न चर्चेला जात आहे 

Post a Comment

0 Comments