Header Ads Widget

रशियात एमबीबीएससाठी झेप; नायगावच्या अक्षय भालेरावांचा अभिमानास्पद सत्कार ! वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवून आई-वडिलांचे नाव उंचावावे; मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव !!

     माधव पवार 
नायगाव येथील डॉ.अक्षय शेषेराव भालेराव यांचा रशिया या देशामध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी प्रवेश झाल्याबद्दल नायगाव तालुका ल.सा.क.म.संघटनेच्या वतीने त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी अक्षय भालेराव यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत 

अक्षय यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल त्यांच्या आई-वडिलांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.श्री.शेषेराव भालेराव व सौ.सुचिता शेषेराव भालेराव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या पालकत्वाचा गौरव करण्यात आलाआहे 

यावेळी नायगाव ल.सा.क. म.संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत डोईवर साहेब,डॉ.गायकवाड साहेब,डॉ.झुंजारे साहेब,बिलोली पंचायत समितीचे सदस्य शेळके साहेब,बैलके सर,माळगे साहेब,पवार साहेब,तोटरे सर,मनुरकर सर,माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद भालेराव,कैलास भालेराव,घंटेवाड,गजानन भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉ.अक्षय भालेराव यांचे अभिनंदन केले.वैद्यकीय शिक्षणात कठोर परिश्रम घेऊन उत्कृष्ट डॉक्टर म्हणून नाव कमवावे,
समाजसेवेची भावना जपावी आणि आपल्या कर्तृत्वाने आई-वडिलांचे तसेच नायगाव तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे,अशा मनःपूर्वक शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या आहेत 

परदेशात जाऊन एमबीबीएसचे शिक्षण घेण्याची संधी मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब असून,अक्षय भालेराव यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून उज्ज्वल भविष्य घडवावे,अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली आहे 

या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन बैलके सर यांनी केले,तर शरद भालेराव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आहे 

डॉ.अक्षय शेषेराव भालेराव यांच्या पुढील शैक्षणिक व वैद्यकीय कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!त्यांच्या हातून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य घडो आणि आपल्या ज्ञान व सेवाभावातून समाजाची सेवा करण्याची संधी त्यांना लाभो,अशा सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत 

Post a Comment

0 Comments