नांदेड जिल्हा शिक्षण व क्रीडा विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय मैदानी व इतर खेळांमध्ये सहभाग नोंदवत लिटल स्टेप च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केरत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हास्तरावर मजल मारली.
लिटिल स्टेप इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग नोंदवत कु.स्नेहा मावले हिने बुद्धिबळातल्या उत्तम चालीच्या बळावर तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे.ती आगामी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पात्र ठरली असून जिल्हास्तरीय स्पर्धेत यशस्वी झेप घेतली. अहिल्यानगर,चारवाडी ता.नायगाव येथील ग्रामीण भागातली ही विद्यार्थिनी जिद्द,परिश्रम आणि सातत्याचा जोरावर तिने हे दैदिप्यमान यश मिळवले.कु.श्रावणी बेळगे यांनी ही उत्तम खेळ दाखवत 17 वर्षे वयोगटात जिल्हास्तरावर प्रवेश मिळवला. बुद्धिबळ या बौद्धिक खेळात लिटल स्टेपच्या विद्यार्थिनींनी सलग आठव्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरावर जाण्याचा विक्रम कायम ठेवला. यशस्वी विद्यार्थिनींचे व त्यांचे मार्गदर्शक श्री जोगेंद्र सिंह ठाकूर सर यांचे संस्थेचे अध्यक्ष खा. रविंद्र पाटील चव्हाण साहेब, संस्थेचे सचिव आदरणीय केशवरावजी पा. चव्हाण साहेब, हनुमंत जाधव सर, राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियन डॉ.ओमकार बालाजीराव पेटेकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले. स्नेहा मावले हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांनी व मार्गदर्शक शिक्षक यांना दिले आहे.पुढील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे....

0 Comments