राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाला असताना सुद्धा राज्यातले मंत्री संत्री आता दौरे करत प्रदर्शन करत आहेत ते दौरे बंद करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील ते पाहणे गरजेचे आहे
या राज्यातले मंत्री संत्री दौरे कशासाठी करत बसले हा महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे
कोरडा दुष्काळ जाहीर झाला मग दौरे कशाला ?
या राज्यातले सरकार शेतकऱ्यांचा नुसता पुळका करणारे सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कसल्याच प्रकारची कोणतीच मदत मिळत नसल्यामुळे शेतकरी वेळोवेळी संकटात सापडत जात असल्याचे स्पष्ट शेतकऱ्यातुन बोलल्या जात आहे
मागील आठवड्यात नांदेड येथे दुष्काळ ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी व कोरडा दुष्काळाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी या दळभद्री सरकार मधील लोकप्रतिनिधी सदरच्या आढावा बैठकीत काजू बदाम खात बसले होते
या सरकारमधील मंत्र्यास संत्र्याचे तात्काळ दौरे बंद करून या राज्यातल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने तात्काळ मदत देता येईल याकडे सरकार लक्ष देण्याची गरज भासत आहे
तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे पंचनामे करण्यासाठी आदेश देण्याची गरज भासत आहे

0 Comments