राज्यातले सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सदरचे सरकार असल्यामुळे हे सरकार नाही शेतकऱ्यांच्या हिताचे नाही गोरगरीब जनतेच्या हिताचे नाही विकास कामाचे केवळ हे पक्ष फोडा फोडीच्या राजकारणात चांगलेच राजकीय पुढारी गुंतले असल्याचे स्पष्ट चित्र वारंवार दिसून येत आहे
या राज्यातील युवतीचे सरकार हे तीन चाकी असल्यामुळे या सरकारमध्ये एकमेकाचा ताळमेळ नसल्याने या राज्यात चांगलाच खेळ खंडोबा राजकीय क्षेत्रात झाल्याचे पाहावयास मिळत आहे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हजारो लाडक्या बहिणीचे पैसे या दळभद्री सरकारने बंद केले त्याच बरोबर पंतप्रधान योजनेचे पैसे हजारो शेतकऱ्याला मिळत नाहीत त्याच बरोबर मुख्यमंत्री नमो योजनेतील शेतकऱ्यांचे शेकडो शेतकऱ्यांचे हप्ते मिळत नाहीत हे सरकार याकडे लक्ष न देता पक्ष फोडीच्या नादात राज्याचे वाटोळे केले आहे
या देशातील महाराष्ट्र लगत असलेल्या राज्या मध्ये सदरचे संबंधित सरकार योग्य पद्धतीने चालवत असल्याचे दिसते मात्र या महाराष्ट्रातले सरकार मात्र पक्ष फोडाफोडीला प्रधान्य देऊन सत्तेत बसले असून असले सरकार सत्तेत राहण्या पेक्षा नसलेले बरे असा संताप जनक सवाल जनतेतून केला जात आहे

0 Comments