Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनी विशाल पाटील यांनी देगाव फाट्या जवळ अवैध देशी दारूच्या ९६ बाटल्या घेऊन जाताना दोघास पकडले !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या देगाव फाट्या जवळ ठाण्याचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह बिट जमादार 
 कंधारे पोलीस कॉन्स्टेबल हंबर्डे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने या भागात पेट्रोलिंग करत असताना अवैध देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या देगाव फाटा येथे  एक पल्सर काळया रंगाची लाल पट्टे असलेली मोटार सायकल क्रमांक एम एच २६  सी ए ८९६४ वर सदरचे इसम नामे १ रामेश्वर गुणवंतराव गुडपे वय ३० वर्षे व्यवसाय मजुरी २ बालाजी गोविंदराव गुडपे वय २८ वर्षे व्यवसाय मजुरी दोघे ही राहणार देगाव येथील रहिवासी आहेत 

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारूच्या एकूण ९६ बाटल्या मोटर सायकलवर एका खाकी रंगाच्या पोत्यात देशी भिंगरी संत्रा जाताना छापा मारला यात मोटार सायकलसह त्यांची किमती सात हाजार सहासे ८० रुपयाचा मुद्दे माल जप्त केला आहे 

सदरच्या मोटर सायकलची किंमत ७० हजार रुपये असा एकूण ७७ हाजार ६८० रुपयाचा माल जप्त केला व चोरटी देशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असलेल्या आरोपीला पकडून त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments