नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथील रहिवासी असलेले जेष्ठ नागरिक कै गणपतराव मारोतराव पाटील शिंदे मांजरमकर यांचे दिनांक १७/७/२०२६ रोजी वर्धाप काळाने निधन झाले ते मृत्यू समयी ते ९८ वर्षाचे होते
बाबा, तुम्ही आमच्यासाठी आयुष्यभर झिजलात. तुमचे प्रेम आणि मार्गदर्शन सदैव आमच्या सोबत राहील. देव तुमच्या आत्म्याला चिरशांती देवो कठीण काळात ही आम्हाला आधार देणारे बाबा आज आपल्यात नाहीतहे दुःख आम्हा फार आहे
तालुक्यातील मांजरम येथील रहिवासी असलेले जेष्ठ नागरिक कै.गणपतराव मारोती पाटील शिंदे यांच्यावर दिनांक १८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मांजरम येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे
बाबा, तुम्ही आज आमच्यात नसलात, तरी तुमचे विचार आणि दिलेली शिकवण प्रत्येक क्षणी आम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे. तुमची उणीव सदैव भासत राहील व खरंच तुम्ही बाबा या हो पुन्हा आम्ही सर्वजन वाट पाहत आहोत
मांजरम येथील रहिवासी असलेले केशव पाटील शिंदे यांचे आजोबा कै.गणपतराव मारोती पाटील शिंदे त्यांच्या
पश्चात सहा मुले व एक मुलगी, नातू पणतू असा मोठा परिवार आहे
तुमची आठवण कायम आमच्या हृदयात राहील. विनम्र श्रद्धांजली "असा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा... तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण करत चंदना सारखे जीवन जगले आहेत बाबा
बाबा तुमच्या आत्म्यास चिरशांती मिळो "बाबा, तुम्ही नाही आहात पण तुमची शिकवण आणि आशीर्वाद आज ही माझ्या प्रत्येक पावलावर सोबत आहेत. तुमची खूप आठवण येते म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे

0 Comments