नायगाव तालुक्यातील रुई व रुई परिसरात मतदार यादीचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षका कडे सोपविल्यामुळे सदरच्या यादीचे काम जोरात चालत असले तरी खेड्यापाड्यातील शाळेत अगोदर शिक्षकांची संख्या कमी प्रमाणात आणि वर्ग जास्त असल्यामुळे सर्व वर्ग कोमात जातअसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा हळूहळू ढसाळत आहे
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकाकडे सदरचे यादी करण्याचे काम सोपीविल्याने शिक्षक वर्ग सदरचे काम करण्यासाठी मग्न आहेत
मतदार यादीचे काम जोमात शिक्षका विना वर्ग कोमात ग्रामीण भागात शिक्षक दारात म्हणे एस आय आर ला हलक्यात घेऊ नका मग तर शिक्षणाचा दर्जा ढासळतो त्यांचं काय ? या वर ही होणे आवश्यक आहे
महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून मतदार यादीचे काम पूर्ण करण्यासाठी शिक्षकाला सदरच्या कामात गुंतले असल्यामुळे ग्रामीण भागाच्या खेड्यापाड्यात आठ वर्ग २ शिक्षक अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा सध्याचे काम शिक्षकाला दिल्याने दोन शिक्षकाला आठ वर्ग सांभाळण्यासाठी वेळ व तारेवरची कसरत करावी लागत आहे
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे जास्तीचे लक्ष देण्याची गरज भासत असून ग्रामीण भागात अनेक शाळांच्या बे अवस्था अगोदरच असल्यामुळे दोन शिक्षक व आठ वर्ग हे शिक्षकानी कसे शिकवायचे हा पालकातून संताप जनक सवाल उपस्थित केला जात आहे

0 Comments