Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार फौजदार विश्वंभर निकम यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमात सहपत्नीक सत्कार व निरोप !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर दिगंबरराव निकम यांची पोलीस खात्यामध्ये गेल्या पस्तीस वर्षा पासून चांगल्या दर्जेची सेवा जनसामान्य माणसाला मिळून दिले आहे 
अशा सूजळ नेतृत्वाचे व मनमिळाऊ व्यक्ती महत्व असलेले पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर निकम यांचा कुंटूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वागतकर यांनी ठाण्याच्या वतीने सेवापूर्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करून सदरच्या कार्यक्रमात निकम यांचा सहपत्नीक सत्कार करून निरोप दिला आहे 

महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत ब्रीदवाक्य "सद्र क्षणाय खल निग्रहणाय" हे असल्यामुळे कुंटूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर निकम या सदरच्या ब्रीद वाक्याच्या अंतर्गत राहून व कायद्याचे पालन करत गेल्या पस्तीस वर्षांची सेवा पूर्ण केली आहे

पस्तीस वर्षाची सेवा करून सेवेतून निवृत्त झाले असल्यामुळे कित्येकांच्या मनात नाराजी निर्माण झाली असली तरी अखेर ५८ वर्षे पूर्ण कार्यकाळ चांगल्या प्रकारे सेवा बजावली आहे

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर निकम यांनी गेल्या पस्तीस वर्षाच्या काळात नांदेड उमरी कंधार मुखेड कुंटूर या पोलीस ठाण्यात चांगल्या प्रकारे आपली सेवा उत्कृष्टपणे बजावली आहे 

कुंटूर पोलीस ठाण्यात आज दिनांक ३० जुलै २०२६ रोजी पोलीस खात्यातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले दमदार पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर निकम यांच्या सौभाग्यवती सुनीताई विश्वंभर निकम यांचा ही निरोप समारंभाच्या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला आहे

पोलीस खात्यात गेल्या पस्तीस वर्षापासून कार्यरत असलेले व सध्याच्या परिस्थितीत सेवानिवृत्त झालेले कुंटूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर निकम यांनी यांनी आपली पोलीस खात्यात कशी जबाबदारी असते त्यांच्या कार्य शैलीतून जन सामान्य माणसाला दाखवून दिले आहे 


Post a Comment

0 Comments