स्वच्छ विचाराच्या मागणीला यश अखेर बिलोली ते बरबडा बस सेवा चालू : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्यासह विश्वनाथ बडुरे यांनी केली होती मागणी केली असल्यामुळे बिलोली आग्रहातील जबाबदार अधिकाऱ्यांनी सदरच्या मागणीला दाद देऊन सदरची बस सेवा सुरळीत चालावी या हेतूने राज्य परीवहन महामंडळाची बस सेवा चालु करण्यात आली आहे
अनेक वर्षां पासून बंद असलेली बरबडा–बिलोली बससेवा आज पासून पुन्हा सुरू करण्यात आली असून ही बससेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील तसेच नायगाव माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांनी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न केले आहे
त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या बससेवेचा सर्वाधिक लाभ बरबडा, पाटोदा,कहाळा , कुष्णुर, घुंगराळा, नायगाव नरसी या गावांतील शेकडो विद्यार्थी, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण, शासकीय कामे, आरोग्य सेवा आणि दैनंदिन प्रवासासाठी ही बस अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
ही बस दररोज सकाळी ६.१५ वाजता बरबडा येथून सुटून ७.३० वाजता बिलोली येथे पोहोचेल. तसेच सायंकाळी ६.१५ वाजता बिलोली येथून सुटून ७.३० वाजता बरबडा येथे मुक्कामी पोहोचेल.
त्यानुसार आज सकाळी सहा वाजता या गाडीचे वाहक ,चालक यांचा वसंत सुगावे पाटील व उपस्थितांच्या हस्ते सत्कार करून गाडी प्रवासी घेऊन नांदेड कडे रवाना करण्यात आली आहे
तीस वर्षा पासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत सुगावे पाटील यांचे आभार मानले आहेत.,या वेळी लक्ष्मण कोम्पलवाड, भास्करराव धर्माधिकारी, रामकिशन तीपलवाड, नागण सुरेवाड, बाबु रुद्रवाड,दिगंबर भुसालवाड,महाजन अंबुलगे,माधव शेवाळे,वायद शेख,महेबूब शेख,गंगाधर शिंगेवाड,
प्रकाश गिरे,आनंदा पोटानवार,आनंदा रेजितवाड,मालकाजी घोसलवाड,यशवंत मदेवाड ,प्रल्हाद जेटेवाड,उत्तम जेटेवाड,बालाजी शेवाळे,किरण हणमंते,अंकुश हणमंते,भगवान शेवाळे ,दिगंबर जेटेवाड लिंगोजी वाटपलवाड व्यंकटी आलमवाड,पोचिराम धुमाळे,गोविंद धर्माधिकारी शंकर कोम्पलवड,माधव इंद्रवाड,बाबु मदेवाड,
बाबु जेंगिलवाड,विक्रम मदेवाड पांडुरंग जेटेवाड,शिवणा पुरमवाड,शिवाजी थेटे व्यंकटी थेटे बालाजी मेंकुदळे,अदी उपस्थित होते

0 Comments