मो नंबर 9561871019
हिमायतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार लक्ष्मण केंद्रे साहेब यांच्या पुढाकाराने पळसपूर येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून हिमायतनगर तालुका डॉ असोशियन चे तालुका अध्यक्ष डॉ. राजेंद्र वानखेडे, डॉ. विकास वानखेडे हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी , डॉ. गणेश कदम
विशेष उपस्थिती पळसपुर चे बिट जमादार विजय आउलवार पो हे,आर एफ गेडाम पो हे पत्रकार अनगुलवार सर, विठ्ठलराव देशमवाड तसेच
इतर मान्यवर डॉ. प्रकाश वानखेडे, गावच्या सरपंच सौ गंगाबाई मांजरे,उपसरपंच गजानन देवसरकर,तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील, माजी सरपंच, पोलीस पाटील शंकर वानखेडे , नागोराव शिदे पळसपुरकर तालुका प्रतिनिधी हिमायतनगर,ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार. गावातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
यावेळी ठाणेदार केंद्रे यांचे मार्गदर्शन झाले
ठाणेदार लक्ष्मण केंद्रे साहेब यांनी तालुक्यातील सर्व गावांना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प मांडला. दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात असे सांगून त्यांनी व्यसन सोडण्यासाठी जनतेला आवाहन केले.
या व्यसनमुक्ती कार्यक्रमातील महत्त्वाचे निर्णय
मोफत औषध वाटप दारू सोडवण्यासाठी स्वखर्चाने आणलेली औषधी पळसपूर येथील 200 लोकांना पहिला डोस देण्यात आला. हे औषध पुढील 4 दिवस दररोज वाटप करण्यात येणार आहे. गावात दारू, गुटखा, पुडी, बीडी, सिगारेट यावर विक्रीवर बंदी घालण्यात आली. एका महिन्यात गावाला पूर्णपणे व्यसनमुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या वेळी डॉ प्रकाश वानखेडे, माजी सरपंच मार्केट कमेटी हिमायतनगर सभापती यांनी व्यसनमुक्ती ओषधीचा पहिला डोस घेऊन गावा साठी आदर्श निर्माण केला आहे
गावकऱ्यांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला असून व्यसनमुक्त पळसपूर घडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आश्वासन या वेळी दिले आहे

0 Comments