Header Ads Widget

घुंगराळा सर्कल मधील शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही : या विभागाचे आमदार व खासदार "अन " राजकीय पुढारी नेमके गेले कुठे ?

           माधव पवार 
पिक विमा कंपनीने पीक विमा शेतकऱ्यांना तुटपुंजी स्वरूपात मदत जाहीर केली असली तरी नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा सर्कलच्या शेतकऱ्यांना अद्याप तरी पिक विमा मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यात संताप व्यक्त होत असला तरी  या विभागाचे आमदार व खासदार नेमके करतात तरी काय ? असा प्रश्न चर्चेला जात आहे 

या विभागाचे राजकीय पुढारी कुठे गेले असा संताप जनक सवाल जन सामान्य माणसातून व्यक्त केला जात आहे 

जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील अनेक मंडळा मध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला असला तरी घुंगराळा सर्कल मधील शेतकऱ्याला अद्याप तरी पिक विमा मिळाला
 नसल्यामुळे या विभागाचे आमदार व खासदार नेमके करतात तरी काय असा प्रश्न जन सामान्य माणसाला पडला आहे 

या राज्यातले दळभद्री सरकार शेतकऱ्यांचा पुळका असल्याचे केविल वानी ढंग करते शेतकऱ्यांच्या बाबतीत या राज्यातल्या दळभद्री सरकारचे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे 

नायागांव तालुक्यातील घुंगराळा सर्कलच्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नाही व कोणी शेतकऱ्यांना हुंगून ही बघत नाही अशा या शेतकऱ्यांचा बेजबाबदार पणा होत असल्याचे सरळ सरळ दिसून येत आहे 


Post a Comment

0 Comments