ग्रामीण भागात शुभकार्याच्या ठिकाणी व शुभ कार्याला सुरुवात करीत असताना पारंपारिक पद्धतीने गण आणि गवळण सादर केली जाते आणि गण गवळणीला अतिशय महत्त्व देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली जाते आहे
मराठी विवाह सोहळ्यां मध्ये 'गण गवळण' किंवा गण आणि गवळण सादर करण्यामागे पारंपरिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे
यामुळे लग्नातील धार्मिक विधींना सुरुवात होते विघ्नहर्त्याला निमंत्रण दिले जाते आणि सोहळ्यात आनंदाचे व भक्तीचे वातावरण निर्माण होते म्हणून लग्न सोहळ्यात प्रथम गण आणि गवळण सादर केली जाते आहे
त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रथम गणरायाला गणाच्या माध्यमातून वंदन करूनच गवळणीच्या माध्यमातून जाऊ दे घट भरण्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बु च्या माध्यमातून गवळण सादर करण्यात आली असून सरच्या गायिका सौं सागरबाई हुस्सेकर यांनी सादर केली आहे
नायगाव तालुक्यातील जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार त्याच बरोबर हार्मोथा शाहीर माधव पाटील इकळीकर पार्टीच्या मुख्य गायिका यमुनाताई दांगटे व सदरची गवळण सादर करणाऱ्या गायिका सागरबाई हुस्सेकर व त्यांचे पती आणि बँजो मास्तर वन्ने
या संचाच्या माध्यमातून जाऊ दे घट भरण्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला ही गवळण सादर करण्यात आली आहे

0 Comments