भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पासून चालू होणारा जयंती सोहळा शांततेत व डीजे मुक्त पारंपरिक वाद्य वाजून सदरच्या महामानवाचा जयंती सोहळा शांततेत पार पाडावा असे यावेळी आवाहन करण्यात आले आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एकूण ४५ गावे असल्यामुळे या सर्व गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने सदरच्या महामानवाची जयंती मोठ्या थाटात व उत्साहात साजरी करण्यात यावी असे आवाहन कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी केले आहे
तालुक्यातील दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी बारा वाजता पोलीस स्टेशन कुंटूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस स्टेशन कुंटूर हद्दीतील सर्व पोलीस पाटील व भीम जयंती मंडळाचे पदाधिकारी यांची शांतता कमिटीची बैठक पार पडली आहे
कुंटूर पोलीस ठाण्यात सदर बैठकी मध्ये दिनांक १४ एप्रिल २०२६ मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या होणाऱ्या जयंतीच्या अनुषंगाने मीटिंगचे आयोजन करण्यात आले आहे
सदरच्या मीटिंग मध्ये जयंती मिरवणुका ह्या शांततेच्या संयमाच्या मार्गाने व कायद्याचे पालन करून पार पाडाव्या डीजे मुक्त वातावरणा मध्ये पारंपारिक वाद्य वाजवून जयंती साजरी करावी असे आवाहन पोलीस स्टेशन कुंटूरच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केले असून सदरच्या कायद्याचे पालन करून सहकार्य करण्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे

0 Comments