Header Ads Widget

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इकळीमाळ येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दत्तराम पा.जाधव उपाध्यक्ष पदी गणेश पा.पुयड यांची निवड*

   बाळु इबीतवार 
तालुक्यातील इकळीमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड मु.अ.रणविरकर गणेश बाबाराव,यांच्या अध्यक्षतेखाली व श्री विठ्ठलराव सुर्यवंशी साहेब (शि.वि.अ.प.स.नायगाव) श्री नागोराव सोमठाणे सर,(पदो.मु.अ.सातेगाव) प्रशांत सोनटक्के (विशेष शिक्षक प.स.नायगाव) यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दत्तराम पा.जाधव तर उपाध्यक्षपदी गणेश पा.पुयड यांची निवड करण्यात आली. इकळीमाळ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हि पहिली ते पाचवी पर्यंत आहे .या शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शाळा नावारुपाला आणली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाली आहे.
सर्व नवनियुक्त सदस्यांच्या संमतीने शाळा व्य.स.अध्यक्षपदी दत्तराम पा. जाधव व उपाध्यक्षपदी गणेश पा. पुयड यांची निवड करण्यात आली. श्री माधव रमेश ढेकळे, श्री मारोती शंकरराव पा.पुयड, सौ सीमा संदीप जोंधळे, श्री सुमेध धोंडीबा जोंधळे, श्री एकनाथ  सुगावे, श्री बालाजी हाणमंत पा.पुयड, सौ वैशाली साहेबराव शिळे, श्री काशिनाथ पा.पुयड (शिक्षण प्रेमी सदस्य), व सौ पदमीनबाई दत्तराम सूर्यवंशी (ग्रा.पं सदस्य प्रतिनिधी) यांची नव्याने सदस्य पदी निवड करण्यात आली.
याप्रसंगी माजी अध्यक्ष सुगंध पा.पुयड, उपाध्यक्ष चंद्रकांत पा.पुयड, व सर्व माजी सदस्य, पो.पा. श्री भीमराव जोंधळे,  संतोष पाटील जाधव, परमेश्वर पुयड, बंटी मजगे, संदिप शिळे, गणेश गिरी, रज्जाक शेख,आदी ग्रामस्थांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

Post a Comment

0 Comments