नायगाव तालुक्यातील रुई बु येथील आयडीया टॉवरची सतत रेंज गायब होत असल्याने मोबाईल धारक संतापले रेंज सोडा अन्यथा शोभेची वस्तू बंद करा असा संताप जनक सवाल मोबाईल धारकांनी केला आहे
आयडीया टॉवर वाल्या कडून मोबाईल धारकांची मोठया प्रमाणात आर्थिक लूट केली जात असताना सुद्धा सदरच्या टॉवरची रेंज परीपकव सोडल्या जात नसल्यामुळे सदरचे आयडीयाचे टॉवर असून अडचण नसून खोळबा अशी अवस्था सदरच्या टॉवरची झाली आहे
तालुक्यातील रुई बु येथे गेल्या वर्षी एरटेलचे टॉवर बसविण्यात आले होते परंतु त्या टावरची रेंज बरोबर येत नसल्यामुळेआयडीयाचे टॉवर बसविण्यात आले आयडीया वाले मोठया थाटाने ग्राहकाला छोटीची सुविधा देऊन आयडीया मध्ये प्रवेश दिला मात्र गेल्या दोन ते तीन दिवसा पासून आयडीया टॉवरचा खेळखंडोबा होत आहे
रुई बु येथील रुई परिसरात आयडीया आयडीया धारकांनी आयडीची रेंज येत असल्यामुळे मोठया प्रमाणात ग्राहक आयडीचे कार्ड खरीदी केले मात्र आयडीची रेंजच येत नसल्यामुळे ग्राहक आता चांगलेच वैतागले आहे
आयडीचे टॉवर रुई बु येथील बेवारस असल्यामुळे या टॉवर कडे कोणीच लक्ष देत नसल्यामुळे सदरचे टॉवर शोभेचे वस्तू तात्काळ बंद करण्यात यावे असे मोबाईल धारकातुन संताप व्यक्त केला जात आहे

0 Comments