बळेगाव येथे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने जिजाऊ नंदन स्वर संगीतसह शिवव्याख्यान कर्ते राहुल गिरी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातील मौजे बळेगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने समस्त गावकऱ्यांच्या वतीने दिनांक ११ मार्च २०२६ रोजी जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बु यांच्यासह बीड येथील रहिवासी असलेले शिवव्याख्याते राहुल गिरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे
जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातील बळेगाव येथे राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब यांचे सुपुत्र शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने जिजाऊ नंदन स्वर संगीत रुई बु यांच्या माध्यमातून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर गीत गायनाचा दुपारी ३ कार्यक्रम गावकऱ्यासह जयंती मंडळाचे अधिकारी व पदाधिकारी यांनी आयोजित केला आहे
उमरी तालुक्यातील बळेगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने संध्याकाळी सात वाजता बीड येथील शिव व्याख्यान करते राहुल गिरी यांचे व्याख्यान मोठ्या उत्साहात होणार आहे
बळेगाव नगरी मध्ये सकाळी साडे सात वाजता शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या ध्वजाचे ध्वजारोहण व पालखी सोहळा व सकाळी ११ ते १ वाजण्याच्या दरम्यान वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत

0 Comments