Header Ads Widget

शांती निकेतन विद्यालय रुई बु येथील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यमान मुख्याध्यापक बन्नाळीकर यांचे योगदान !!

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील शांती निकेतन विद्यालय रुई बु येथील विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक बन्नाळीकर सर यांचे मोठे योगदान लाभले असून सदरील शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्याध्यापकासह शिक्षकांची टीम मोठी जोरदार जमली आहे 

जिल्ह्याच्या नायागांव तालुक्यातील शांती निकेतन विद्यालय रुई बु हे विद्यालय शिक्षण क्षेत्रात मोठी भरारी घेतली असल्यामुळे या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा टक्केवारीच्या बाबतीत ही मोठ्या प्रमाणात वाढला आहे 

नायगाव तालुक्यातील शांती निकेतन विद्यालय ही ग्रामीण भागातील गोरगरीब व जनसामान्य माणसांच्या मुला मुलींना शिक्षण मिळावे म्हणून राजकीय क्षेत्रात वादळ उडून देणारे माजी मंत्री तथा मा.खासदार दिवंगत गंगाधरराव मोहनराव देशमुख कुंटूरकर यांच्या डोळस विचारातून या शाळेची निर्मिती करण्यात आली आहे 

तालुक्यातील शांतीनिकेतन विद्यालयाचा मुख्याध्यापक म्हणून बन्नाळीकर सर यांनी पदभार स्वीकारल्या पासून या विद्यालयातील शिक्षणाचा दर्जा चांगल्या प्रकारे वाढला आहे 

शांती निकेतन विद्यालय रुई बु येथे शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना या शांती निकेत विद्यालयाची सुसज्ज इमारत लाखो रुपये खर्चून बांधण्यात आली आहे 

या सदरच्या शाळे मध्ये मोठ्या प्रमाणात मुली शिक्षण घेत असल्यामुळे या विद्यालयाचा दर्जा ही चांगल्या प्रकारे सुधारला असल्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत रुई बु विद्यालय उंच भरारी घेतली आहे 

Post a Comment

0 Comments