Header Ads Widget

नायगाव तालुक्यात प्रजासत्ताक दिनी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा काही ठिकाणी वादळी झाल्या तर काही ठिकाणी ग्रामसेवका विना नूतन सचिवाची नेमणूक प्रश्न अनेक उत्तर मात्र झिरो !!

           माधव पवार 
नायगाव तालुक्याच्या खेड्यापाड्यातील ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ग्रामसभा ह्या काही ठिकाणी वादळी स्वरूपात झाल्या तर काही ठिकाणी ग्रामसेवकाविना नूतन सचिवाची नेमणूक करून नावालाच ग्रामसभा घेण्यात आले आहेत 

तालुक्यातील खेड्यापाड्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले मात्र ग्रामसेवक उपस्थित नसल्याने व नूतन सचिवाची नेमणूक केल्याने केलेल्या प्रश्नाचे उत्तर मात्र नागरिकांचे समाधान करण्यासाठी पूरक नव्हते त्या त्यासाठी अनेक  गावातील सदरच्या ग्रामसभा ह्या वादळी स्वरूपाच्या ठरल्या आहेत आहेत

ग्रामसभा ठेवण्यामागचे कारण गावातील ग्रामपंचायत कार्यालयाला आलेल्या निधीच्या बाबतीत कुठे विकास करण्यात आला व किती निधी ग्रामपंचायत कार्यालयाला शिल्लक व त्यासाठी कोणता विकास करायचा यासाठी सरपंचाकडून व ग्रामसेवकाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळू शकले नसल्यामुळे अनेक ठिकाणच्या ग्रामसभेतून सरपंचा सह ग्रामसेवकाला निघून जावे लागले आहे  

तालुक्याच्या खेड्या पाड्यातील अनेक गावे विकासा पासून खिडकीळ झाले असल्यामुळे पाच वर्षाच्या कार्यकाळात सरपंच व ग्रामसेवक यांनी कोणता विकास केला यावर चर्चा करण्यासाठी खेड्या पाड्यातील ग्रामसभेला काही ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य सुद्धा अनुपस्थित होते आणि नागरिक मात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते 

पाच वर्षांच्या कार्यकाळात सरपंच व ग्रामसेवक यांनी गावच्या विकासासाठी कोणता विकास केला हे मोठ्या स्वाभिमानाने सांगण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक सज्ज असला पाहिजे पण तसे झाले नाही गावचा विकास पहिला झिरो स्वरूपाचा दिसून येतो आहे 




Post a Comment

0 Comments