नायगाव तालुक्यातल्या राजकीय पुढाऱ्यानी घरकुल धारकाच्या पहिल्या हप्त्यासाठी प्रयत्न केले असले तरी घरकुल धारकांना दुसरा हप्ता म्हणून सत्तर हजाराचा मिळत नाही राजकीय पुढाऱ्यांनी कधी यांच्यासाठी प्रयत्न करणार असे जन सामान्य माणसातून केला जात आहे
नायगाव पंचायत समितीच्या ढिशाळ कारभारामुळे व शासनाकडे घरकुलाचे बजेट नसल्यामुळे घरकुल धारकांच्या बँक खात्यात पैसे जमा होत नसल्याचे स्पष्ट दिसत असले तरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा वाढला आहे
काही महिना खाली पंचायत समितीच्या गैर कारभारा बद्दल या नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी फार मोठी कामगिरी केल्याचे दाखवून दिले आहे
नायगाव पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहार घेऊन काम केले असल्याच्या संदर्भात सदरच्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले परंतु सदरचे कर्मचारी कार्यमुक्त झाल्याच्या नंतर घरकुल धारकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे
गेल्या एक ते दीड महिन्याखाली मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी पंचायत समितीच्या जबाबदार अधिकाऱ्यांशी बातचीत करून घरकुल धारकांना पहिला हप्ता पंधरा हजाराचा मिळवून दिला आणि पडल्याच्या नंतर दुसरे ही पुढारी श्रेय लाटायला सुरुवात केली आहे
नायगाव तालुक्यातील घरकुल धारकांच्या पहिल्या हप्त्यासाठी श्रेय लाटणाऱ्या राजकीय पुढार्यांना लाभार्थ्यांच आवाहन असून एका मराठी म्हणी प्रमाणे मेहनत करी मुर्गी अंडी खाये फकीर अशी गत निर्माण होऊ नये असे लाभार्थ्यांचे स्पष्ट मत आहे
श्रेय लाटणाऱ्या राजकीय पुढारी आणि आता लाभार्थ्यांच्या सत्तर हजाराच्या हप्त्यासाठी अधिकाऱ्यांशी बातचीत करून या दोन दिवसात सत्तर हजाराचा हप्ता जमा करणार का ? असा सवाल जन सामान्य माणसातून केला जात आहे

0 Comments