Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत थर्टी फर्स्ट आवश्यक साजरा करा परंतु कोणी हुलडबाजी करून धिंगाणा करण्याचा प्रयत्न केल्यास थेट पोलीस कोठडी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांचा कडक इशारा !!

     माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या खेड्यापाड्यात असो अथवा नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असो कोणत्या ही व्यक्तीने धिंगाणा करू नये असे आवाहन सपोनि विशाल पाटील भोसले यांनी केले आहे

सन २०२५ हा सर्वासाठी सुखा समाधान पद्धतीने गेला असून मावळत्या वर्षाला निरोप देऊन नूतन वर्षांचे सर्वांनी स्वागत करायच असल्यामुळे ठाण्याच्या अंतर्गत थर्टी फर्स्टच्या नावाखाली नशाबाजी करून धिंगाम मस्ती करणाऱ्याची गैय केली जाणार नाही असा कडक इशारा सपोनि विशाल पाटील यांनी दिला आहे

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सर्वत्र शांततामय वातावरण असल्यामुळे या सदरच्या वातावरणाला थर्टी फर्स्टच्या नावाखाली नशा बाजी करून हुलट बाजी करणाऱ्याची गैय केली जाणार नाही जर कोणी केल्यास त्यांची रवानगी थेट पोलीस कोठडीत केली जाईल असा इशारा ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना दिला आहे 

कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण ४५ गावे येतात या सर्व गावांमध्ये शांततामय वातावरण असल्यामुळे कोणत्या ही परिस्थिती मध्ये थर्टी फर्स्ट साजरा करत असताना कोणत्या ही व्यक्तींनी हुलटबाजी करून डीजे लावून थर्टी फर्स्ट हा दिन साजरा करू नये असे काही आढळून आल्यास त्यांच्यावर थेट पोलीस कारवाही करण्यात येईल व पोलिसांचे आपल्याकडे कटाक्ष पूर्ण लक्ष राहील यांची खबरदारी स्वतः घेऊन थर्टी फर्स्ट साजरा करावा असे आवाहन ही सपोनि विशाल पाटील भोसले यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments