Header Ads Widget

गावचा हिरा हिरावून नेला माधव पांडे यांचे दुखद निधन रुई बु.नगरीवर शोक कळा अंत्यविधी आज एक वाजता !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील गावचा हिरा हिरावून नेला माधव अर्जुन पांडे यांचे दुखद निधन दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी झाले असून रुई बु.नगरीवर शोक कळा पसरली असून त्यांची अंत्यविधी आज दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी एक वाजता करण्यात येणार आहे 

मृत्यू हे अंतिम सत्य आहे” हे जरी खरे असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते, त्या कुटुंबावर तो सर्वात मोठा आघात असतो जेव्हा आपल्या जवळची एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला कायमचे सोडून जाते कि जी परत आपल्याला कधीच दिसणार नसते 

अशावेळी आपल्या सर्वांनाच मोठे दुःख होते. अशावेळी तर त्या कुटुंबातील व्यक्ती खूपच हतबल होतात. जन्म व मृत्यू या जरी आपल्या हातातील गोष्टी नसल्या तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते, त्या घटनेच दुःख त्याच कुटुंबातील व्यक्ती समजू शकतात म्हणून पांडे परिवाराच्या कुटूंबाच्या दुःखात सहभागी होऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत 

तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले कै माधव अर्जुन पांडे वय ४६ वर्ष या गावच्या काळाला दुष्ठ काळाने अखेर फास टाकून हिरावून नेला असल्यामुळे त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कळताच सर्व गावकऱ्याना धक्का बसला आहे 

रुई बु येथील रहिवासी असलेले कै. माधव अर्जुन पांडे यांच्या पश्चात आई, चार बहिणी, दोन मुली, एक मुलगा आणि एक सून असा त्यांचा परिवार आहे 

Post a Comment

0 Comments