नायगाव तालुक्यात गेल्या महिन्या पासून वाघाची व बिबटयाची नुसती अफवा केली जात असल्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे
तालुक्यात खरच वाघ अथवा बिबट्या आला का ? आला तर मग वन विभागाच्या अधिकाऱ्याला अथवा कर्मचाऱ्याना सदरचा बिबट्या अथवा वाघ सापडत का नाही उगीच अफवा करून दहशत निर्माण केली जात असल्यामुळे जन सामान्य नागरिकासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे चांगलेच वैताकले आहे
ग्रामीण भागात जर वाघ अथवा बिबट्या वास्तव्य करीत असेल तर मग हे प्राणी कुठून आले आहेत तर मग त्यांना जंगलातून कोण सोडले यांच उत्तर कोणाकडे आहे का ? असा प्रश्न चर्चेला जाताना ऐकावयास मिळत आहे
वाघ अथवा बिबटया म्हणजे काय घरचे पाळीव प्राणी नव्हे कुठे ही मोकाट फिरायला या सदरच्या प्राण्याला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सक्षम असताना त्यांना का ? वाघ अथवा बिबट्या दिसत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे
ग्रामीण भागातील खेड्या पाड्यातील नागरिकांना का दिसत नाही सदरचे अधिकारी व कर्मचारी दहा ते १५ मिनिटात हे कर्मचारी येत आहेत तर ते प्राणी जमिनी खाली लपत आहेत का असा प्रश्न चर्चेला जात आहे
आजच रुई बु शिवारात वाघ दिसला म्हणून अफवा करण्यात आली वाघ तर नव्हताच परंतु रानातल शेतात राहण्याच कुत्र नव्हतं या वरून समजते की सदरची नुसती अफ़वाच आहे

0 Comments