नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात कृष्णुर एमआयडीसी परिसरात बिबट्याच्या भीतीने जनसामान्य माणसाचे मन सैरा वैरा झाले असल्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण मोठ्या प्रमाणात झाले असून या भागातील नागरिकांनी आवश्यक सावधान राहिले पाहिजे परंतु अफवा करू नये असे देगलूर बिलोली वनपरिक्षेत्राचे अधिकारी देवकते यांनी आवाहन केले आहे
कृष्णूर परिसरासह व इतर परिसरात जर तर बिबट्या दिसला तर नागरिकांनी पळून अथवा खाली नये कारण तो आपल्यावर अटॅक करू शकतो परंतु त्या उलट जर बिबट्या दिसलास तर नागरिकांनी हातावर करून जोर जोराने चिरकायचे कारण तो बिबट्याला असे वाटू शकतो की तो आपल्या पेक्षा मोठा असू शकतो म्हणून स्वतःच्या बचावासाठी पळून जातो आहे
जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कृष्णूर एमआयडीसी परिसरात एका तरुणासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी देगलूर बिलोलीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी देवकते यांनी ज्या कंपनीमध्ये बिबट्या दिसला त्याचं ठिकाणी कॅमेऱ्यासह पिंजरा लावून वन विभागातील कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे
नायगाव तालुक्यातील कुष्णूर एमआयडीसी परिसरातील नागरिकांनी शेतात व इतर ठिकाणी वावरत असताना अगदी दक्षतेने राहवे परंतु कोणत्या ही परिस्थिती मध्ये बिबट्याच्या बाबतीत अफवा करू नये कारण सदरच्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची टीम सक्षम असल्याचे देगलूर बिलोली क्षेत्राचे परिक्षेत्र अधिकारी देवकते यांनी नायगाव फास्ट न्यूज बोलताना सांगितले आहे
तालुक्यातील कृष्णुर एमआयडीसी भागात आलेला बिबट्या हा एकाच ठिकाणी राहू शकत नाही तो कुठे ही वावरू शकतो त्यासाठी शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी व महिलांनी दक्ष राहण्याची गरज आहे

0 Comments