Header Ads Widget

कुष्णूर गणातून वंचित बहुजन आघाडी कडुन दिपक गजभारे घुंगराळेकर इच्छुक असल्यामुळे येणार मैदानात !!

      माधव पवार 
सध्या होऊ घातलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्या  अनेक पक्ष व कार्यकर्ते आपापल्या  सोयीनुसार हालचाली सुरु केल्या आहेत.

त्यामध्ये बरबडा सर्कल खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला असुन त्यामध्ये बरबडा गण हे सर्वसाधारण महिलेसाठी आहे तर कष्णूर गण हे एस सी पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित आहे. 

बरबडा सर्कल मधील कुष्णूर गणातून वंचित बहुजन आघाडी चे युवा दक्षिण चे जिल्हाउपाध्यक्ष दिपक गजभारे 
घुंगराळेकर हे इच्छुक आहेत.

बरबडा सर्कल मधील कुष्णूर गणात चांगली पकड असुन त्यांचा मोठया प्रमाणात दांडगा संपर्क आहे अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात त्यांना मानणारा वर्ग मोठया प्रमाणात आहे

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या संपर्कात नेहमी राहतात त्यांच्या दौऱ्यात नेहमीच कार्यशील असतात म्हणुन या पक्षाने तिकीट दिल तर त्यांना फायदाच होईल असे नागरिकांतून बोलल्या जात आहे.

बरबडा सर्कल मध्ये गेले अनेक वर्षापासून रंगदार लढती व अटीतटीच्या निवडणुका झाल्या मात्र आगामी निवडणुकीत देखील या सर्कलमध्ये मोठी चुरशीची व रंगतदार लढत होण्याची शक्यता मानली जात आहे

कारण या सर्कलमध्ये पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता होती मात्र मागील काही वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालत होऊन सर्व काही राजकीय समीकरणे बदलले गेले आहेत. या सर्कल मध्ये तसेच दोन्हीही गणात मोठे तगडे उमेदवार उभे केले असून वंचित धनशक्ती विरुद्ध जणशक्ती वंचित च्या उमेदवाराने होत आहे.
 
या निवडणुकीत वंचित आपले खाते नायगाव तालुक्यात खोलेल का हि तेवढीच उत्सुकता लागून राहिली आहे

या निवडणुकीत कोणाला किती कसा धक्का बसेल हे येणारच काळ ठरवेल पण वंचित बहुजन आघाडी च्या यानिवडणुकीच्या रणधुमाळीत उडी घेतल्याने अनेक उमेदवाराला झोप उडाली असल्याची चर्चा अनेक गावात चावडीवर होत आहे. तरी कृष्णूर गणातून दिपक गजभारे यांना वंचित बहुजन आघाडी कडुन तिकीट देण्याची मागणी जनतेतुन होत आहे.

सध्या महाराष्ट्रभर मराठा आरक्षणामुळे फायदा कोणत्या पक्षाला होईल का? उमेदवार बघुन मतदान केले जातील हे येणारा काळच ठरवेल. तसेच ओबीसी आरक्षण तसे गाजत आहे कोणत्याही मराठा उमेदवाराला मतदान करायचे नाही असे ओबीसी नेते ठणकावून सांगत आहेत याचा परिणाम स्थानिक पातळीवर होईल का असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे.

Post a Comment

0 Comments