Header Ads Widget

कृष्णुर पंचायत समिती गणातुन यादव कोंडीबा वाघमारे भाजपा कडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटाच्या अंतर्गत असलेल्या कृष्णुर पंचायत समिती गणातुन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिवंगत कोंडीबा वाघमारे यांचे चिरंजीव यादव कोंडीबा वाघमारे हे सदरची पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचे नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

तालुक्यातील कृष्णूर येथील भूमीपुत्र यादव कोंडीबा वाघमारे हे कृष्णूर पंचायत समिती गणातुन सदरच्या पंचायत समितीच्या रण धुमाळीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत 

या पूर्वी या कृष्णूर पंचायत समिती गणातुन दिवंगत कोंडीबा वाघमारे हे सदरची निवडणूक लढविली होती आता याच गणातुन त्यांचे पुत्र यादव कोंडीबा वाघमारे पंचायत समितीची निवडणूक लढविण्याची तयारी भारतीय जनता पार्टी कडून दाखविली आहे

जिल्हा परिषद बरबडा गटाच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीची निवडणूक सुद्धा मोठया अटी तटीची होणार असल्यामुळे सर्वच पक्षाचे व राजकीय पुढाऱ्याचे लक्ष लागले आहे 

Post a Comment

0 Comments