Header Ads Widget

कोणत्या ही निवडणुका लागताच विकासावर बोलता आणि पाच वर्षे जाऊन कुठे झोपता ? जनतेचा राजकीय पुढार्‍यांना सडेतोड सवाल !!

       माधव पवार 
लोकसभा असो की विधानसभा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असो की ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणूक असो या निवडणूका लागताच राजकीय पुढार्‍यांना विकाससाचे डोहाळे लागतात व पोकळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल वर्षानु वर्ष करीत आहे 

तर मग निवडणुकीच्या काळात दिलेले आश्वासन पाच वर्षात ही पूर्ण होऊ शकत नाहीत मग तर निवडणूक काळात विकासावर का बोलता तर पाच वर्षे कुठे जाऊन झोपता असा सवाल जनसामान्य माणसातून राजकीय पुढाऱ्यांना केला जात आहे 

सदरच्या निवडणुका लागल्या वरच राजकीय पुढाऱ्यांना विकासाच्या संदर्भात आठवण येते व मतदाराची दिशाभूल करून निवडणुकीच्या रिंगणात उभे टाकत आहेत

कोणत्या ही  निवडणुकी मध्ये विजयी झाल्याच्या नंतर पाच वर्षे विकासाकडे दुर्लक्ष करून आपल्या सन्मानिय खुर्चीवर बसतात व पाच वर्षाच्या कार्यकाळात कुठलाच विकास न करता पुढारी आपल्याच तालात फिरत असल्याचे वास्तव चित्र अनेक दिसून आले आहे 

निवडणुकीच्या काळात दिलेले पोकळ व खोटे आश्वासन राजकीय पुढारी हे आपले फत्ते करून घेतात आणि पाच वर्ष सदरच्या जनतेला त्याचा परत भोग भोगावा लागतो  आहे 

निवडणुकीच्या काळात दिलेले खोटे आश्वासन व खोटे आश्वासन हे राजकीय पुढारी कधीच पूर्ण करू शकत नाहीत असे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे

Post a Comment

0 Comments