नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गट हा मातबर राजकीय पुढाऱ्यांचा असला तरी या जिल्हा परिषद गटात गटा गटात राजकारणा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिवडा चिवडी होते कोणी म्हणतो आमचा बालेकिल्ला कोणी म्हणतो आमचा बाले किल्ला तर दुसरा आमचा बाले किल्ला आहे
जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गट हा राजकीय पुढाऱ्यांचा बाले किल्ला समजला जातो परंतु तो बालेकिल्ला राजकीय पुढाऱ्यांचा नसून तो मतदारांचा आहे येथील वास्तव्यास असलेल्या जनतेचा असल्यामुळे राजकीय पुढाऱ्यांनी हे विसरता कामा नये असे मत जन सामान्य माणसातून व्यक्त केल्या जात आहे
नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटा अंतर्गत असलेल्या बरबडा वाडीचा रस्ता अद्याप कोणत्याच सत्तेत असलेल्या व सत्तेतून बाहेर गेलेल्या नेत्यानी या रस्त्या कडे लक्ष दिले नाही अथवा या रस्त्या वरून जाणाऱ्या बरबडा वाडी गावातील नागरिकाचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणी प्रयत्न केला नाही असे वास्तव चित्र आहे
तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटातील फक्त राजकारणच पाहून घ्याव विकासाचा सत्यानास झाला असून या सदरच्या विकासाकडे कोणताच पुढारी लक्ष देण्यास तयार झाल्याचे दिसत नाही कोणत्या ही निवडणूका येऊ द्या त्या निवडणुकी दरम्यान विकासाचे गाजर जनतेला दाखविले जात आहे
निवडणूकीत राजकीय पुढारी आपला उमेदवार विजय करून घेण्यासाठी मतदाराची देशी दारूची बॉटल आणि नोट पे ओट करून घेऊन विजयी होत असल्याचे वास्तव अनेक वेळा या विभागात दिसून आले आहे

0 Comments