नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटाकडे सर्वात राजकीय पक्षांचे लक्ष लागून असल्यामुळे बरबडा जिल्हा परिषद गटातून नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील मोरे यांच्या सुनबाई धनश्रीताई मनोज पाटील मोरे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक सांगण्यात येत आहे
जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती यांच्याकडे सर्वच पक्षांच्या राजकीय पुढार्यांचे लक्ष असल्यामुळे काही दिवसात येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकी मध्ये नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील मोरे यांच्या सुनबाई धनश्री ताई मनोज पाटील मोरे टाकळीकर ह्या इच्छुक उमेदवार असल्यामुळे सदरची निवडणूक सहज लढवू शकतात असे चित्र दिसून येत आहे
माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांचे चिरंजीव व प्रसिद्ध गुत्तेदार म्हणून ओळख असलेले मनोज पाटील मोरे टाकळीकर हे सध्या काँग्रेस पक्षाकडे असले तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे
प्रसिद्ध गुत्तेदार मनोज पाटील मोरे टाकळीकर हे सध्याच्या परिस्थिती मध्ये काँग्रेस पक्षात सामील असले तरी नांदेड जिल्ह्याच्या एका बड्या नेत्याच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तुलीत जात आहे
भारतीय जनता पार्टीकडे बरबडा जिल्हा परिषद गटाची उमेदवारी मनोज पाटील मोरे टाकळीकर यांच्या सौभाग्यवती धनश्री ताई मनोज पाटील टाकळीकर यांना मिळवून देण्यासाठी पक्ष श्रेष्ठी कडे मागणी करणार आहेत

0 Comments