मागील सप्टेंबर महिन्यामध्ये नांदेड जिल्यात मध्ये 36 पोलीस स्टेशन पैकी उत्कृष्ट कामगिरी बाबत नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व टीम यांना उत्कृष्ट कामा बाबत दोन प्रशस्तीपत्र देऊन आय जी शहाजी उमाप साहेब यांनी अभिनंदन केले आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये कौतुकास्पद कामगिरी मध्ये अनेक गुन्हेगारांना प्रतिबंध करून त्यांना mpda अंतर्गत एक वर्षासाठी जेलमध्ये पाठवले, अनेक गुन्हेगारांना हद्दपार केले, इतर गुन्हेगार व दारू विक्रेते यांच्यावर उत्कृष्ट प्रतिबंधक कारवाई केली म्हणून पोनि चिंचोलकर पीएसआय कुसमे पोलीस अंमलदार तेजबंद यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे
तसेच नांदेड ग्रामीण हद्दीतील जास्तीत जास्त समन्स बजावणी करून 92% पेक्षा जास्त समन्स बजावणी केली व जास्तीत जास्त साक्षीदार यांना कोर्टात हजर केले म्हणून पोनि चिंचोलकर पोहवा मुंडे, पोहवा जगताप, पोहवा जाधव यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे
या वर्ष्यात पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब यांनी ग्रामीण पोलिसांच्या विविध हेड खालील उत्कृष्ट कामगिरी संबंधाने चार वेळा प्रशस्ती पत्र देऊन गौरव केलेला आहे
पोनि चिंचोलकर यांच्या कार्यकाळामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशन मधील गुन्हेगारांवर वचक बसली असून गुन्हेगारी कमी झालेली आहे.

0 Comments