हिमायतनगर. तालुक्यातील कामारवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगणमत करून कुठलाही ठराव न घेता व कुठलीही सभा न लावता परस्पर श्रीशा इंटरप्राईजेस या नावाने निधी उचलला असल्याने गटविकास अधिकारी कार्यालया समोर प्रमुख तीन मागण्या साठी मनमंदे यांच्याआमरण उपोषणाच्या आहेत त्यापैकी मोजे कामारवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे पंधराव्या वित्त आयोगातून सरपंच व ग्रामसेवक यांनी दोन लाख 63 हजार 272 रुपयांचा निधी कोणतीही काम न करता परस्पर पैसे उचलून घेतल्याबद्दल त्यांची खाते निहाय चौकशी त्वरित करण्यात यावी, दुसरी मागणी आहे सदरील सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर तात्काळ कायदेशीर रित्या कार्यवाही करण्यात यावी , तिसरी मागणी आहे मोजे कामारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत गावकऱ्यांसाठी लावण्यात आलेल्या बोर जवळ पाण्याच्या टाक्या सरपंच व त्यांच्या सहकार्यांनी चोरून नेल्या होत्या त्या परत त्याच जागी लावण्यात याव्यात असे उपोषण करते रामराव दशरथ मनमंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि सदरील 15 वित्त आयोगाचा निधी दोन लाख 63 हजार 272 रुपये एवढ्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी संबंधिताची खातेनिहाय चौकशी करून सदरील अपहार केलेलि रक्कम दंडास शासन खाति जमा करून घेण्यात यावी व संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी गटविकास अधिकारी हिमायतनगर यांच्या कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते रामराव दशरथ मनमंदे कामारवाडी तालुका हिमायतनगर यांनी काल दिनांक 6. रोज सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून या प्रकरणांमध्ये काय चौकशी होणार आणि गटविकास अधिकारी दोषी चोकशी अंति सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर काय कारवाई करणार आहेत याकडे सबंध तालुक्याचे लक्ष लागून आहे

0 Comments