नायागांव फास्ट न्यूज : नेटवर्क -- माधव पवार -
दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी सिद्धार्थ नगर आखाडा बाळापूर येथे आरोपी अजय रमेश सोनवणे वय २९ वर्षे व्यवसाय मजुरी राहणार बदनापूर तालुका बदनापूर जिल्हा जालना यांनी त्यांची सासू लताबाई नागोराव खिलारे वय पन्नास वर्षे व्यवसाय घर काम राहणार सिद्धार्थ नगर आखाडा बाळापूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली हिला मयत हिचे घरी बाजेच्या लाकडी ठाव्याने डोक्यात मारून खून केला आहेसदरील घटनेत पत्नी हिला त्यांनी मारून जखमी केले होते म्हणून आरोपीचा मेहुना सुरज नागोराव खिल्लारे वय २५ वर्षे व्यवसाय मजुरी राहणार सिद्धार्थ नगर आकडा बाळापूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांचे फिर्यादी वरून पोलीस स्टेशन आकडा बाळापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता
आकाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जावायाने केले सासूचा खून मा. न्यायालयाने सुनावली जावयास जन्म ठेपेची शिक्षा आणि चाळीस हजाराचा दंङ सदरील गुन्हाचा तपास पोउपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी तपास कसून केला होता
आकाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २९४ ऑब्लिक २०२३ कलम ३०२, ३२६, ३२४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होऊन सदर गुन्ह्यातील आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक हिंगोली उपविभागीय पोलीस अधिकारी सपोनि पंढरीनाथ बोधनापोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी कसून तपास केला आहे
त्यांचा सत्र खटला क्रमांक ४३/२०२३ असा होता सदरची केस ही माननीय जिल्हा सत्र न्यायालय झिरो एक हिंगोली सौ सरोज एन माने गाडेकर यांच्या न्यायालयात चालविण्यात आला आहे
सदरील प्रकरणात माननीय न्यायालयात जिल्हा सरकारी वकील एस एस मुटकुळे यांनी ११ साक्षीदार तपासणी व युक्तिवाद केला असून कोर्ट अमलदार म्हणून सुनिता धनवे विष्णू कांत यांचे मार्गदर्शनाखाली काम पाहिले व समन्सचे काम शेषराव जोगदंड वामन हिरवे यांनी पाहिले आहे

0 Comments