Header Ads Widget

श्री गणेश उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी गणरायाचे विसर्जन शांततेत करण्यासाठी कुंटूर पोलिसांचे पतसंचलन - सपोनि विशाल पाटील भोसले !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत म्हणजे प्रॉपर कुंटूर येते दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी श्री गणरायाचे विसर्जन होणार असल्यामुळे या विसर्जनाच्या काळात व मिरवणुकीमध्ये कसल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्या नेतृत्वाखाली पतसंचलन करण्यात आले आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्या कार्यकाळात  कायदा सुव्यवस्था अबाधित टिकून राहण्यासाठी व जन सामान्य माणसाला विश्वासात घेऊन कुंटूर पोलीस ठाण्याचा कारभार करत असल्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ४५ गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहे 

कुंटूर ठाण्याचा जबाबदार अधिकारी म्हणून लाभलेले कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सर्वत्र शांतता अबाधित राहण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

ठाण्याच्या अंतर्गत काही दिवसात म्हणजे सहा सप्टेंबर रोजी श्री गणरायाची विसर्जन होत असल्याने सर्व गावातील सरपंच व पोलीस पाटील तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष व गणेश मंडळाचे अधिकारी व पदाधिकारी यांनी विसर्जन करते वेळी आपण कोणत्या ठिकाणी विसर्जन करत आहोत

व त्या ठिकाणच्या पाण्याची पातळी किती आहे यांचा प्रथम अभ्यास करून त्या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी ठिकाण शोधावे आणि त्याचबरोबर महत्त्वाची सूचना म्हणजे छोट्या छोट्या मुलांना गणपती विसर्जन करण्याच्या वेळी सोबत घेऊन जाऊ नये असे वारंवार कंट्रोल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले पाटील यांनी सांगत आहे 

कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित टिकून राहण्यासाठी प्रॉपर कुंटूर येथे कुंटूर पोलीसाचे पतसंचलन ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे  

Post a Comment

0 Comments