Header Ads Widget

पिक नुकसानीचे पंचनामे कृषी सहाय्यक व तलाठी यांच्या कडून चालू मात्र सरसकट नाही ? सरसकट करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुलजी कर्डीले यांनी नायागांवच्या तहसीलदाराना आदेश द्यावेत - शेतकऱ्याची मागणी !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यात दिनांक २७ व २८ तारखेला अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान असताना सुद्धा सदरच्या पिक नुकसानीचे  पंचनामे कृषी सहाय्यक व तलाठी यांच्या कडून चालू करण्यात आले मात्र सरसकट नसल्याचे सांगण्यात येत आहे

रुई बु येथील शेतकऱ्याचे पंचनामे गावचे पोलीस पाटील श्रीकांत देशमुख यांच्या समक्ष करण्यात येत असले तरी ते पंचनामे सरसकट नसल्याचे सांगण्यात येत आहे

तालुक्यात अतिवृष्टी मोठया प्रमाणात होऊन पिकाचे नुकसान झाले असताना सुद्धा गावातील बोटावर मोजण्या इतक्या लोकांचे पंचनाम ? कृषी सहाय्यक व तलाठी यांच्या पंचनामे करण्यात येत असले तरी करण्यात येत नाहीत त्यासाठी सदरचे पंचनामे सरसकट करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल जी कर्डीले यांनी नायगावच्या तहसीलदाराना आदेश द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे 

नायागांवचे कृषी सहाय्यक जे एस पाटील आणि तलाठी 
एस.जी.म्याकलवार ताई यांच्या कडून पिक नुकसानीचे पंचनामे स्वतः शेतात जाऊन करत असले तरी सदरचे पंचनामे सरसकट नसल्यामुळे शेतकऱ्यातुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे

नांदेड जिल्हाचे जिल्हाधिकारी राहुलजी कर्डीले यांना शेतकऱ्याची चांगली जाण असल्यामुळे नायगावच्या तहसीलदार डॉ धम्म प्रिया ताई गायकवाड यांना सरसकट शेतीचे पंचनामे करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी शेतकरी राजांनी नायागांव फास्ट न्यूजच्या ऑनलाईन बातमी तुन केले आहे

Post a Comment

0 Comments