Header Ads Widget

विद्यार्थ्यांनी स्वतःला शिस्त लावून यशस्वी व्हावे--डॉ. विठ्ठलराव लहाने यांचे प्रतिपादन !!

प्रल्हाद आयनेले सर 
नांदेड/प्रतिनिधी--विद्यार्थ्यांनी स्वतःला शिस्त लावून अभ्यास केले तर त्यांच्या पंखात बळ येऊन ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन, नामवंत वक्ते डॉ विठ्ठलराव लहाने यांनी केले.
गोकुळ लॉन्स येथे शेजुळे सरांच्या रॉयल अकॅडमीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. लहाने बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप,आ. बालाजीराव कल्याणकर यांचे बंधू युवा नेते एकनाथ कल्याणकर, पोलीस निरीक्षक तांबे, पोलीस निरीक्षक अजय साखळे , माजी सैनिक जनार्दन शेजुळे आदींची उपस्थिती होती.
रॉयल अकॅडमी च रोपट,  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीने वटवृक्ष होत असतानाच नामवंत वक्ते डॉ.विठ्ठलराव लहाने यांचे मार्गदर्शन आमच्यासह  विद्यार्थी, पालकांना मिळालं हे आमच मी भाग्य समजतो. गेल्या शैक्षणिक वर्षात अकॅडमीतील दहावी, शिष्यवृत्ती पात्र, नवोदय प्रवेश पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्याचा योग म्हणजे विद्यार्थ्यांना मिळालेली संजीवनीच असल्याचे अकॅडमीचे संचालक तथा 
स्वागताध्यक्ष अर्जुन गोविंदराव शेजुळे चिखलीकर यांनी प्रास्ताविकातून आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, स्पोर्ट्स सायकल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
पुढे बोलताना डॉ. लहाने म्हणाले शिक्षणाशिवाय प्रगती नाही, तुमच्या प्रत्येकाच्या दरवाज्यावर संधी खट खटत असते, तो दरवाजा उघडा आणि संधीचे सोने करून घ्या. अभ्यासाचे टाईम टेबल बनवा, ७ तास झोपा,५ तास अभ्यास करा परीक्षेच्या पुढे अभ्यास करण्याचे टाळा, अभ्यासात सातत्य ठेवा, तुमचे आई-वडील म्हटले पाहिजे अभ्यास बस, झालं! झोप आता असे सांगून आई-वडिलांनी आपल्या पाल्यां समोर आप -आपसातील  वाद टाळावा आणि पाल्यांना वेळ द्यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी करून शेजुळे सरांच्या रॉयल अकॅडमीतील शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल शेजुळे, विष्णू चौरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उर्मिला साबळे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments