Header Ads Widget

शाबास : नांदेड पोलीसाचे विशेष प्रयत्न कंबोडीयात अडकलेला मुलगा मायदेशी परत : पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत !!

      माधव पवार 
दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी समीर शेख महबूब वय २५ वर्षे राहणार रहिमपूर वसरणी नांदेड हे एजंट मार्फत जॉब साठी मुंबई येथून कंबोडिया देशात गेले असता तिथे गेल्यावर शेख समीर यांना बेकायदेशीर क्रिप्टो करन्सी त्यांचे काम करण्यास सांगण्यात आले आहे 

सदर काम करण्यास त्यांनी नकार दिला असता त्यांना तेथे सदर काम करणे बाबत त्याचे वर जबरदस्ती करत त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात येऊ लागली व सदर मारहाण करतानाचे व्हिडिओ शेख समीर यांच्या घरी पाठवून पैशाची मागणी करण्यात येऊ लागली आहे

त्यामुळे शेख समीर यांचे नातेवाईक हे नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची भेट घेऊन त्यांना वरील सर्व हकीगत सांगितले आहे 

जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सदर प्रकरणी तात्काळ कारवाई सुरू करून लागलीच कॉम्बोडीया या देशातील भारतीय दुतावास कार्यालयाशी संपर्क साधला आहे 

व त्यांच्या संपर्कात राहून पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथील एक पत्र शेख समीर यांचे नातेवाईकांना देऊन त्यांना मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेयर्स कार्यालय दिल्ली येथे तक्रार देने का मी पाठविले तेथे जाऊन नातेवाईकांनी तक्रार दिली आहे

 त्या नंतर सुद्धा नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड हे सदर बाबत भारतीय दूतावास कार्यालया कडून वेळोवेळी पाठपुरावा घेऊ लागले आहे

 पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या प्रयत्नाला यश मोठे आले असून दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी शेख समीर शेख मेहबूब हे सुरक्षित रित्या भारतात परत आले आहेत 

सदरच्या मुलगा सुखरूपरीत्या घरी परत आलेले पाहून नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले 

त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कौतुकास्पद कामगीरीमुळे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे शेख समीर शेख महबूब यांनी विशेष कौतुक करत त्यांचे स्वागत केले आहे



Post a Comment

0 Comments