Header Ads Widget

पैनगंगा नदी वरिल सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाविषयी विरोधकांनी शेतकऱ्यांचा विचार करावा अधिकाऱ्यांना आणून जनतेला प्रकल्पाची माहिती देणार - आ.बाबुराव कदम कोहळिकर

नागोराव शिदे पळसपुरकर 
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर 
मो नंबर 9561871019

हिमायतनगर.   सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला जो कोणी विरोध करण्यासाठी पुढाकार घेतला असेल त्यांनी पुढे यावे. आपण या विषयावर चर्चा करून शेतकऱ्यांचे आणि सर्व नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांकडून मागवून शंकांचे निरसन करु. जर लोकांना प्रकल्प नको असेल तर आपण रद्द करण्यास सांगू. पण फक्त राजकीय फायद्यासाठी कोणीही भांडवल करून लोकांच्या भावनांशी खेळू नये. असे आवाहन हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार  बाबुराव कदम कोहळिकर यांनी केले आहे. पाण्याची गरज असते त्या काळात म्हणजे भर उन्हाळ्यात सर्व पैनगंगा नदी कोरडी पडते. शेतकऱ्यांचे पाण्यासाठी हाल हाल होत आहेत. त्यामुळेच या उच्च पातळी बंधाऱ्यांची शासनाकडून मंजुरी मिळवली आहे. या प्रकल्पाच्या वरच्या बाजूला ६ बंधारे आणि हा एक वैशिष्ट्यपूर्ण बंधाराच असून याच पैनगंगा नदीवर खालच्या बाजूला असलेल्या निंगणूर येथील सॅंडल धरणात पाणी सोडून त्यावर जलविद्युत निर्मिती करण्याचा हा प्रकल्प आहे. यापूर्वी मुळचा
१९५६ साली प्रस्तावित केलेला हा प्रकल्प आहे तो बराच मोठा होता त्यात जंगल संपदा नष्ट होणार होती म्हणून शासनाने दुसरा आराखडा तयार केला होता त्यात सुद्धा बरीच गावे विस्थापित होणार होती त्यावेळी २२० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होणार होता परंतु आता या मूळ सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पात पैनगंगा नदीच्या पात्रात फक्त ३३ दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा होणार आहे.
या धरणाची उंची एवढी कमी केली आहे की त्यामध्ये एक गाव सुद्धा विस्थापित होणार नाही एक गावच का एक घर सुद्धा उठण्याची गरज पडणार नाही अशी माहिती आ. कदम यांनी दिली आहे. आम्ही जलसंपदा विभागाच्या हिवाळी अधिवेशन
व अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. राज्याचे जलसंपदा मंत्र्याकडे सुद्धा विषय लाऊन धरला. या प्रकल्पासाठी विधानभवनात बैठक झाली तिथे सुद्धा मागणी लाऊन धरली. एकूण ५ आमदारांनी लक्षवेधी उपस्थित केली. एक गावच काय एक घर सुद्धा बुडीत क्षेत्रात जाणार नाही. उलट या धरणातून बऱ्याच लोकांना भूसंपादित केलेली शेती सुद्धा रब्बीच्या पिकासाठी उपयोगात येणार आहे. काही लोक राजकीय हेतूने जाणीवपूर्वक या प्रकल्पाच्या विरोधात प्रचार करीत आहेत. पावसाळयाचे पाणी या प्रकल्पात अडून निघून धरणात प्रवाहित केले जाणार आहे आणि नंतर निंगणूर येथे वीजनिर्मिती होणार आहे. काहीही असले तरी शेवटी मी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या सोबत आहे. जर लोकांना प्रकल्प नको असेल तर मी सुद्धा तुमच्या सोबत राहून प्रकल्पाला विरोध करेल. पण हा प्रकल्प काय आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे पाणीसाठा
(बॅकवॉटर) कुठपर्यंत आहे? हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय विरोध करणे म्हणजे अंधारात काठी मारण्यासारखा प्रकार आहे. ज्यावेळी या प्रकल्पाविषयी खरी माहिती लोकांना समजेल त्यावेळी कोणीही विरोध करणार नाही आणि विरोध करण्याची पाळीच येणार नाही असा मला विश्वास आहे.

सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प सध्या मंजुरीच्या विविध प्रक्रिया पूर्ण करीत आहे अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. या बाबतीत नागरिकांना माहिती देण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच पैनगंगा प्रकल्पाच्या विभाग क्रमांक ५ च्या कार्यकारी अभियंत्यांना सोबत घेऊन नागरिकांना सर्व माहिती पुरवण्यासाठी हिमायतनगर तालुक्यात बैठक घेण्यात येईल, अशी माहिती आ. कदम यांनी दैनिक लोक परिवर्तनशी बोलताना दिली आहे

Post a Comment

0 Comments