Header Ads Widget

नायगाव येथील गुरुकृपा होम अप्लायन्सेस दुकानात पाणी शिरून अंदाजे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान तालुक्यात पाणीच पाणी !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे गुरुकृपा होम 
अप्लायन्सेस दुकानात पुराचे पाणी शिरूर अंदाजे १५ ते २० लाखाचे नुकसान झाल्याचे ऑनलाइन बातमीच्या माध्यमातून  सदरचे वृत्त प्रकाशित करण्यात येत आहे 
तालुक्यात दिनांक २७ ऑगस्ट ते २८ रोजी झालेल्या मुसळधार पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे गुरुकृपा होम अप्लायन्सेस या दुकानात पुराचे पाणी शिरले असल्यामुळे अंदाजे १५ ते वीस लाखाचे नुकसान झाले असल्याचे सदरच्या दुकानाचे मालक शंकर नरशिंगराव कासटवार यांनी नायागांव फास्ट न्यूज सांगितले आहे
 गेल्या दोन दिवसा पासून मुसळधार पावसामुळे नायागांव तालुक्यासह खेड्या पाड्यात चांगलीच पूर परिस्थिती निर्माण झाली असून नायगाव येथील गुरुकृपा होम अप्लायन्सेस दुकानात पाणी शिरल्याने सदरच्या दुकानदाराचे प्रचंड नुकसान झाले असल्याची माहिती आहे 
तालुक्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली होती परंतु सदरच्या दुकानांमध्ये पाणी शिरून एवढे प्रचंड नुकसान झाले नसल्याचे सदरच्या दुकानदाराने सांगितले परंतु यंदा दोनच दिवसाच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन सदरच्या दुकानातील १५ ते वीस लाखाचे नुकसान झाल्याचे दुकानाचे मालक बालाजी नरसिंगराव कासटवार व शंकर नरसिंगराव कासटवार यांनी सांगितले आहे 

नायगाव येथील गुरुकृपा होम अप्लायन्सेस दुकानात पाणी शिरून अंदाजे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान तालुक्यात पाणीच पाणी झाले असून सदरच्या दुकानदाराच्या दुकानात ४ ते ५ फूट पाणी शिरल्याचे सदर च्या व्हिडीओ मधून स्पष्ट चित्र दिसून येत आहे 



Post a Comment

0 Comments