माधव पवार
नायगाव तालुक्यातील कंटूर पोलीस ठाण्याचे दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी तालुक्यातील बरबडा येथील गोदावरी पत्रातील अनेक महिन्या पासून महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून रेतीची अवैध रित्या बोटीच्या साहाय्याने उपसा करून विक्री करत असलेल्या आड्यावर धाड मारून विशाल कारवाई केली आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी विशाल कामगिरी केली असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे
नायगावच महसूल प्रशासन नेहमी झोपेचे सोंग घेऊन वावरत असते परंतु सदरच्या कारवाई करण्यासाठी तहसील प्रशासन धजावत नसल्याचे दिसून येत आहे
नायगावच तहसील प्रशासन झोपेतच असताना कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सदरची कामगिरी केली आहे
महसूल प्रशासन आयत्या वेळी आयत्या कार्यवाहीत तहसील प्रशासन सहभाग घेत घेऊन पोलिसासह महसूल प्रशासनाची संयुक्त कारवाई असे सांगितले जात आहे
कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी बरबड्याच्या गोदावरी पात्रात अवैधरित्या रेतीचा उपसा करणाऱ्या आड्यावर धाड टाकून सदरचा अड्डा उध्वस्त केला असल्याची माहिती आहे

0 Comments