Header Ads Widget

नांदेड जिल्हासह खेड्या पाड्यात मंगल मूर्तीचे ढोल ताशाच्या गजरात आगमन अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन !!

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षाची परंपरा जपत  जिल्हासह खेड्या पाड्यात गौरी शंकराच्या नंदनाची मोठया थाटा माटात वाजत गाजत आणून मंगल मूर्तीची स्थापना करण्यात आली असून उत्सवाहाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 
जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी गणरायाचे मोठया थाटात ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले ठीक ठिकाणी गणरायाच्या आरत्या करण्यात आल्या असून सदरचा गणेशोत्सव हा आज दिनांक २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत मोठया थाटात कार्यक्रमाचे करण्यात येणार आहे
सदरचा गणरायाचा मंगल सोहळा हा चांगल्या प्रकारे व शांततेत पार पडावा म्हणून जिल्ह्यतील पोलीस यंत्रणा म्हणजे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्यासह पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी मोठे प्रयत्न करीत आहे

श्री गणेशोत्सवाचा सण संपूर्ण महाराष्ट्रीयन जनतेचा आवडता सण असून आपण ही नक्कीच गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत होतो आज दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी मंगलमूर्ती ची स्थापना करण्यात आली असून श्री गणेश बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जातात त्यांना प्रत्येक पुजेत प्रथम पूजनीय स्थान प्राप्त आहे

श्री गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करतात.या काळात रोज सकाळी व संध्याकाळी गणपतीची आरती म्हटली जाते. त्यांना मोदकांचा प्रसाद दिला जातो अकरा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला मूर्तीचे जागोजागी पोलीस बंदोबस्तात विसर्जन केल्या जाते

श्री गणेशोत्सव काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस यंत्रणा चांगलीच यंत्रणा लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments