नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ४५ गावात आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी श्री गण रायाच्या मंगल मूर्तीची स्थापना होणार आहे
या काळात कोणी दारुच्या नशेत अथवा जाणूनबुजून कायद्याचा व शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची गैय केलीच जाणार नाही असे कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील यांनी इशारा दिला आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या श्रीगणेश उत्सवाच्या काळात खबरदार कोणी उलडबाजी करण्याचा प्रयत्न करू नये कारण हा सदरचा गण रायाचा उत्सव हा अतिशय शांततेत पार पाडण्यासाठी कुंटूर पोलीस प्रयत्न करीत आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मोठया प्रमाणात श्री गणरायाच्या मूर्तीची स्थापना होणार असल्यामुळे दैनंदिन गणेश मंडळ अधिकारी व पद अधिकारी यांच्या कडून रात्रीच्या वेळी कार्यक्रम घेतले जात असले तरी ध्वनी कमी आवाजात वाजवणे गरजेचे असल्यांचे कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी सांगितले आहे
खेड्या पाड्यात सुद्धा श्री गण रायाच्या कार्यक्रमा निमित्त गावात सर्वांनी शांतता ठेवणे अतिशय महत्वाचे असून जर कोणी कायद्याचा अथवा शांततेचा भंग केल्यास त्यांची कसल्याच प्रकारची गैय केली नाही असा थेट इशारा कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी दिला आहे

0 Comments